गंगापूरात होमगार्ड डे उत्साहात साजरा

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूरात होमगार्ड पथकाची रविवारी सकाळी १०: वाजता होमगार्ड कार्यालय येथे नियमित साप्ताहिक कवायत आयोजित करण्यात आली. याच दिवशी ७८ व्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त होमगार्ड उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी होमगार्ड कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उपस्थितांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी समादेशक अधिकारी चंद्रशेखर पाटील, पीटीसी मनोज आहेर, संतोष पाटील, राजू सोमवंशी, इमरान शेख, शरद पाटील, यांच्यासह कार्यक्रमाला पुरुष व महिला होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमातून शिस्त, स्वच्छता व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.